Saturday, July 4, 2009

कातर वेळ


ढग दाटून आल्यावर मन कसं कावरं बावरं होत ... मराठीच्या पुस्तकात वाचलेला कोणता तो धडा आठवत नहीं पण, त्यात एक छान शब्द होता "कातर वेळ"....... खर तर ही वेळ म्हणजे संध्याकाळची.. छान देवा पुढे दिवा-बत्ती करायची .. पण एखादी संध्याकाळ वेगळी असते.. नेमके त्याच वेळेला ढग देखील दाटून येतात .. आणि मनात सुरु होतो Flashback चा खेळ ...

मायेच्या स्पर्शाला भूकेलं मन, मग पोरकं होउन एकटच भीजत बसत अश्रुंच्या पावसात..
कशासाठी केला होतास हा अमेरिकेचा अट्टहास, कोसत बसतं मग मनातल्या मनात ..

"स्वप्न पडला होतं रे मला, तू कुठे तरी वाट हरवलास आणि घरी परत आलासच नाहीस"
अस फ़ोन वर सांगणारया आईचे पाणवलेले डोळे दिसतात ..

"आमच देखील आता वय झाल.. घरी परत ये, आणि आम्हाला जबाबदारीतून मोकळं कर"
सांगणारया बाबांचे थकलेले खांदे दिसतात..

हल्ली मामाच पत्र हरवतही नाही.. आणि ते आम्हाला सापडतही नाही .. "डोंगर का पाणी" म्हणत.. गल्लीभर भटकणारे भीडू नाहीत .. लगोरया रचताना शेकवणारा चेंडू नहीं ..आणि गोट्या खेळताना वीत ढापली म्हणुन भांडणारा दीनूही नाही

कातर वेळ अशीच मग निघून जाते...आणि सरत्या रात्री बरोबर नवीन दिवसाची चाहुल देते .. आठवणिंच्या राज्यात रमलेले मन मग हळूच व्यवहाराच्या वास्तवात येउन बसते ...

No comments: