Sunday, July 26, 2009

एग्झीट..


आपल्या आयुष्यात घडणारया घटना एका नाट्य-प्रयोगा प्रमाणे असतात....फक्त तो प्रयोग एकांकिका की दोन अंकी किंवा तीन अंकी याची आपल्याला पूर्व कल्पना नसते..

प्रयोग ऐन रंगात आला असताना, दुसऱ्याच अंकात किंवा मध्यंतरात आपली अनपेक्षित एग्झीट होते.. यात एक गम्मत सुद्धा असते.. नायक कोण, नायिका कोण, खलनायक कोण, सूत्रधार कोण.. याची सुतराम कल्पना नसते.. प्रत्येक जण आपणच नाटकाचे नायक.. या प्रमाणे भूमिका बजावत राहतो.. पण.. जशी अचानक एग्झीट होते तशा अचानक भूमिका सुद्धा बदलतात.. विनोदाच्या अंगानी जाणारा प्रयोग, अचानक.. रहस्यमय होतो.. भावनेला..करुणेची झालर लागते..

पण प्रयोग रंगत राहतो.. पात्र बदलली तरी दिग्दर्शक तोच राहतो.. एका मागून एक प्रयोग तो निर्माण करतो.. आणि मिळेल ती भूमिका वठवण्या शिवाय आपल्या हातात फारस काही नसतं ..

No comments: