Friday, July 31, 2009

का? कुणास ठावूक..


का? कुणास ठावूक..
आज सूर्य मला म्हणाला; "मी विश्रांती घेतो..,
तू ही घे,.. गरज आहे आपल्याला.. "
पण ना त्याला राहवलं ना मला.

बिचारा.. मुसळधार रडत होता..
म्हणालो 'मित्रा', तुला पाऊस बरा भेटला ..

का? कुणास ठावूक..
पण आज पाऊसही एकाकी वाटला..
चहाच्या टपरीवर एकटाच बसला होता..
मला म्हणतो, "ये की मित्रा सोबतीला.. "

बिचारा उगाच वाहवत होता..
म्हणालो 'दोस्ता', तुला वारा कूठं रे गावला?

का? कुणास ठावूक..
पण आज वारा सुद्धा भरकटलेला ..
उगाच हैदोस घालत सुटलेला..
छत्री उडवून सूर्याची आसवं दाखवत होता

तिघांनाही तसाच सोडून,
मी आपला समुद्रा कडे गेलो..
तो शांत होता..
म्हणाला.. ये मित्रा.. तुझीच वाट पाहत होतो..

सकाळी सुर्यानीच सांगावा दिला..
आणि आताच पाऊस वाऱ्या सोबत अश्रू ढाळून गेला..
उत्तर नाही रे आमच्या कडे ...
फक्त आधार आहे आमचा तुला..

पण, का? कुणास ठावूक..
मला अजून अर्थच नाही कळला.

No comments: