आणि हो.. कितीही वेळ बोलू शकते ती...
बोलता बोलता जिंकून घेते ती..
समोरच्याला आपलसं करून घेते ती...
तिला कळतच नाही, ...कित्ती बोलते ती.. !!!
आपण काहीच का बोलत नाहीत? असही बोलते ती..
तुम्ही बोललातच नाहीत हेही विसरते ती,
कदाचित,... तुमच्या बोलण्याची वाट पाहते ती..
एक दिवस बोलू नका..मग जाणवत काय बोलते ती..
आणि हो.. म्हणालो का मी?.. की खूप छान बोलते ती??
No comments:
Post a Comment