की... सांगण मलाच कधी हो जमलं नाही?
ती बोलत राहिली..मी ऐकत राहिलो..
तिचं बोलण माझा आधार करून बसलो..
एकदा म्हटलं तिला,
तुला कुणी आवडलं तर काय करशील?
झटकन म्हणाली..
तुलाच की रे येऊन सांगीन..
फुलली कळी.. क्षणात विझली ...
तूच सांगशील माझ्या "त्याला" अस जेव्हा ती म्हणाली..
तिला खरच;.. कधीच हो कळलं नाही..
ती निरपेक्ष, निष्पाप बोलतच राहिली..
आणि कधी तरी तिला उमगेल..
याची मी देखील वाट पाहीली
अखेर करून निर्धार एक दिवस,
उलगडली मी गाठ अलगद
पण हि नाही हो स्टोरी सिनेमाची,
आणि Happy Happy शेवटाची..
विचार करून मग दिवस चार..
म्हणाली, आता ऐक माझं थोड फार.. (?)
मित्र की रे तू माझा चांगला..
पण "तुझा" असा कधी विचारच नाही आला...
विसर सारं जे घडलं काही ..
खरच ..मला रे कधी कळलंच नाही..
1 comment:
Whoa!! Whats got into you?? You are belting out poems with such finesse!!
Baap hoti ultimate!! hyachya aadhichi pan..aadhi comment karayla aalshipana kela..but couldnt resist this time!
All the best dude!!
It will be, if it's meant to be :)
Post a Comment