Thursday, August 20, 2009

कळेल का ग तुला कधी....


कळेल का ग तुला कधी,
प्रेम म्हणजे काय असतं?
जाणवेल का ग तुला कधी,
वाट पहाणं काय असतं?

समजेल का ग तुला कधी,
वेडं मन काय असतं?
दिसेल का ग तुला कधी,
मिटल्या डोळ्यांत काय असतं?

जरी असलो गर्दीत कधी
तरी मन एकटच असतं...
सांगशील का ग त्याला कधी,
स्वप्न नेहमीच खर नसतं...

कळेल का ग तुला कधी,
प्रेम म्हणजे काय असतं?
कळेल का ग तुला कधी,
प्रेम म्हणजे काय असतं?

No comments: